UCO Bank Bharti 2025 : पदवीधर उमेदवारांसाठी युनायटेड कमर्शियल (UCO) बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अप्रेंटिस पदाच्या 532 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आवाहन केले आहे. बँकेत करिअर करण्याची ही एक नामी संधी चालून आली आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट व इतर अटी आणि पात्रता सविस्तरपणे खाली देण्यात आले आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.
UCO Bank Bharti 2025
भरती विभाग : युनायटेड कमर्शियल बँक
भरतीचे नाव : युको बँक भरती
एकूण जागा : 532
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
पदाचे नाव : अप्रेंटिस
निवड कालावधी : फक्त अप्रेंटिस साठी निवड केली जाईल.
UCO Bank Bharti 2025 पदनिहाय तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
| 01 | अप्रेंटिस | 532 |
UCO Bank Bharti 2025 Education Qualification
शैक्षणिक पात्रता : सदरील भरतीसाठी उमेदवार हा पदवीधर उत्तीर्ण असावा.
वयाची अट : उमेदवाराचे वय 20 ऑक्टोबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे असावे.
अर्ज फी (Application Fee )
- खुला/ओबीसी/EWS : ₹.800/-
- PwBD : ₹.400/-
- SC/ST : फी नाही.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरू दिनांक | 21 ऑक्टोबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 ऑक्टोबर 2025 |
UCO Bank Bharti 2025 Use Full Links
| मूळ जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया (Selection Process)
- ऑनलाईन परीक्षा
- निवड यादी
लागणारी लागणारी कागदपत्रे
- सद्यस्थितीचा फोटो आणि स्वाक्षरी
- जन्मतारखेचा पुरावा,(SSC Certificate)
- 10 वी/12 वी उत्तीर्ण गुणपत्र/प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र (इतर pdf वाचा)
भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- सदर भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि अर्जाचा इतर कोणताही मार्ग स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी प्रथम स्वतःची नोंदणी अनिवार्यपणे करावी.
- जर पात्र असाल तर, भारत सरकारच्या NATS पोर्टल https://nats.education.gov.in या अप्रेंटिसशिप पोर्टलवर(“विद्यार्थी नोंदणी/लॉगिन” विभागात जा)NATS पोर्टलसाठी, उमेदवार पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर https://nats.education.gov.in/student_type.php ला भेट देऊन “UCO बँके” ची अप्रेंटिसशिप जाहिरात पाहू शकतात.
- लॉगिन करून संबंधित माहिती सविस्तरपणे भरून घ्या माहिती भरून झाल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार गुणपत्र आणि प्रमाणपत्र सोबत आपला सद्यस्थितीचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून घ्या.
- ऑनलाइन पेमेंट यावरती क्लिक करून आपले पेमेंट करावे त्यानंतर अर्ज सबमिट करून अर्जाचे प्रिंट कॉपी करून घ्यावी येणाऱ्या प्रक्रियेसाठी उपयोगात ठरणार आहे.
- कोणत्याही शंका आणि स्पष्टीकरणाच्या बाबतीत, info@bfsissc.com वर ईमेल पाठवता येईल.
⚠️ महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.


