Indian Army SSC Tech Bharti 2026: भारतीय सैन्य दलात अभियांत्रिकी उमेदवारांना नोकरीची संधी; आजच करा अर्ज

Indian Army SSC Tech Bharti 2026 : भारतीय सैन्य दलात अभियांत्रिकी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सैन्य दल अंतर्गत 67 वी Short Service Commission (SSC) टेक्निकल पुरुष आणि महिला एंट्री ऑक्टोबर 2026 साठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मार्फत पुरुष उमेदवारांसाठी 350 व महिला उमेदवारांसाठी 31 जागा जाहीर केल्या आहेत.

सदर भरतीसाठी पुरुष उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया 07 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. महिला उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया ही 06 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असून, 04 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरू राहील. या भरतीसाठी अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्या.

Indian Army SSC Tech Bharti 2026

एकूण जागा : 381

कोर्सचे नाव : 67th SCC (T) (पुरुष) & 67th SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2026

पदाचे नाव आणि पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01Short Service Commission (SSC) Technical – Men350
02Short Service Commission (SSC) Technical – Women31

Education Qualification For Indian Army SSC Tech Bharti 2026

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E/B.Tech अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेली असावी.
  • अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेले उमेदवार ही अर्ज करू शकतात.
  • Civil, Mechanical, Electrical,Electronics,Computer Science,IT, Production, Automobile,Electronics & Telecommunication, Architecture या शाखांसाठी ही पदे आहेत.

Indian Army SSC Tech Recruitment 2026Age Limit

वयाची अट : Short Service Commission (SSC) Technical Men & Women उमेदवारांसाठी वयाची अट ही 20 ते 27 वर्षे असणार आहे.

निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन अर्जाचे शॉर्टलिस्टिंग
  • मुलाखत
  • वैद्यकीय तपासणी
  • गुणवत्ता यादी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Indian Army SSC Tech Bharti 2026 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने

अर्ज फी : कोणतीही फी नाही

अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा

  • पुरुष उमेदवारांसाठी 07 जानेवारी 2026 ते 05 फेब्रुवारी 2026 पर्यंत
  • महिला उमेदवारांसाठी 06 जानेवारी 2026 ते 04 फेब्रुवारी 2026 पर्यंत

How To Apply For Indian Army SSC Tech Bharti 2026

  • अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • Indian Army च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • Online Application Form भरा.
  • आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करून त्याची एक प्रिंट घ्या.

महत्वाच्या लिंक्स

📝 जाहिरात pdfपुरुष उमेदवार – क्लिक करा
महिला उमेदवार – क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाईटभेट द्या

भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.

Leave a Comment