Khadki Cantonment Board Bharti 2026 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे विविध वैद्यकीय पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या भरती मार्फत एकूण 014 रिक्त जागा भरण्यात येणार असून, उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे (Walk In Interview) करण्यात येणार आहे. ही एक सरकारी आणि निमसरकारी नोकरीची उत्तम संधी आहे.
सदर भरती मार्फत स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ आणि ईसीजी तंत्रज्ञ अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत. नियुक्त उमेदवारास महिना ₹.24,500 ते 28,000 इतके मासिक वेतन दिले जाईल. मित्रांनो तुम्ही जर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असेल आणि तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक नामी संधी आहे.
पुढे या लेखामध्ये आपणास रिक्त पदांची माहिती, पात्रता, वयाची अट, निवड प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे, मुलाखत दिनांक आणि अर्ज कसा करावा या बद्दलची माहिती देण्यात आली आहे. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा तसेच ताज्या नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा.
Khadki Cantonment Board Bharti 2026-भरतीची माहिती
भरती संस्था : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे अंतर्गत
भरतीचे नाव : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2026
रुग्णालय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटल
एकूण पदे : 14 जागा
नोकरी प्रकार : करार तत्त्वावर
अर्ज प्रक्रिया : मुलाखत
पगार : ₹.24,500 ते 28,000
Khadki Cantonment Board Bharti 2026 Posts & Vacancies
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | स्टाफ नर्स | 06 |
| 02 | डायलिसिस तंत्रज्ञ | 02 |
| 03 | फार्मासिस्ट | 03 |
| 04 | एक्स-रे तंत्रज्ञ | 02 |
| 05 | ईसीजी तंत्रज्ञ (महिला) | 01 |
| एकूण | 14 |
Eligibility Criteria For CB Khadki Bharti 2026
पद क्र.1: GNM/B.Sc (Nursing)
पद क्र.2: B.Sc (डायलीसीस तंत्रज्ञ) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) B.Pharm/D.Pharm (ii) हॉस्पिटलचा 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) एक्स-रे तंत्रज्ञ कोर्स (iii) हॉस्पिटलचा 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) ECG तंत्रज्ञ कोर्स
वयाची अट : नमूद नाही
नोकरी ठिकाण : पुणे
CB Khadki Bharti 2026 Salary Details
- स्टाफ नर्स / डायलिसिस तंत्रज्ञ – ₹28,000 प्रति महिना
- फार्मासिस्ट / एक्स-रे तंत्रज्ञ / ईसीजी तंत्रज्ञ – ₹24,500 प्रति महिना
Interview Address मुलाखतीचा पत्ता
मुलाखत ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटल,कॅन्टोनमेंट बोर्ड,17, फिल्ड मार्शल करिअप्पा मार्ग, खडकी, पुणे – 411003,पुणे, महाराष्ट्र.
रिपोर्टिंग वेळ: सकाळी 9.00 वाजता
मुलाखत वेळ: सकाळी 10.00 वाजता
मुलाखत तारीख: 10 फेब्रुवारी 2026
Khadki Cantonment Board Bharti 2026 Selection Process-निवड प्रक्रिया
- थेट Walk-in Interview
- कागदपत्रांची पडताळणी
- शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे निवड
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (सर्व मार्कशीट्स)
- अनुभव प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधार / पॅन)पासपोर्ट साइज फोटो
- रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती
वरील सर्व कागदपत्रे उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी घेऊन येणे आवश्यक आहे.
अर्ज कोण करू शकतो?
- महाराष्ट्रातील सर्व उमेदवार अर्ज करू शकतात.
- पुरुष व महिला दोघेही अर्ज करू शकतात.
- फक्त ईसीजी तंत्रज्ञ पद महिलांसाठी राखीव आहे.
भरतीच्या महत्त्वाच्या लिंक्स
| 📃 जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| 🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.



