Gramsevak Bharti Maharashtra 2026: ग्रामसेवक कसे बनायचे? बघा संपूर्ण माहिती!

Gramsevak Bharti Maharashtra 2026 : मित्रांनो तुमचे देखील ग्रामसेवक बनायचे स्वप्न असेल पण त्याबद्दलची हवी ती योग्य माहिती मिळत नाही तर हा लेख तुमच्यासाठी आहे. यामध्ये आपणास हवी ती संपूर्ण माहिती मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया या बद्दलची संपूर्ण माहिती. ज्यामध्ये शिक्षण पात्रता, वयाची अट, पगार, परीक्षा, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, कागदपत्रे यादी, परीक्षेची तयारी, पुस्तके. तसेच तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्ही ग्रामसेवक भरती 2026-27 महाराष्ट्र तयारी करत असाल, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे लवकरच जिल्हा परिषद मार्फत ग्रामसेवक पदांसाठी भरती निघणार आहे. त्यामुळे तुम्हाला ग्रामसेवक भरती 2026 महाराष्ट्रची संपूर्ण माहिती असायला पाहिजे.

ग्रामसेवक कसे व्हायचे संपूर्ण माहिती

ग्रामसेवक पद हे सुरुवातीचे 3 वर्ष कंत्राटी म्हणून असतात, तुमचे 3 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला विहित भरतीच्या नियमानुसार कायमस्वरूपी ग्रामसेवक पदाकरीता नियुक्त करण्यात येते. हे उमेदवार लक्षात घ्यावे. आता ग्रामसेवक बद्दल सर्व माहिती बघूया.

भरतीचे नावGramsevak Bharti Maharashtra 2026
पदाचे नावग्रामसेवक
भरती विभागग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
अधिकृत वेबसाईटhttps://rdd.maharashtra.gov.in
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

ग्रामसेवकचे काम काय असते ?

तसे पाहता गावातील सर्व शासकीय कामे ही ग्रामसेवकाच्या देखरेखेखालीच चालतात. गावात कोणतीही योजना राबवायची असल्यास पहिले नाव ग्रामसेवकाचेच येते. म्हणून गावातील ग्रामपंचायत कार्यभार सांभाळणार व्यक्ती म्हणजे ग्रामसेवक ज्याचे नाव बदलून आता ग्रामपंचायत अधिकारी ठेवले आहे.Gramsevak Bharti Maharashtra 2026

ग्रामसेवक शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria For Gramsevak

उमेदवाराची 60% टक्के गुणांसह 12 वी पास तसेच संगणकाचे ज्ञान MS-CIT झालेली असावी, किंवा पदावर रुजू झाल्यावर 2 वर्षाच्या आत MS-CIT सर्टिफिकेट सादर करावे लागते. तसेच समाज सेवेचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येते.

वयाची अट|Age Limit

  • खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्ष
  • राखीव प्रवर्ग : 18 ते 43 वर्ष
  • दिव्यांग उमेदवार : 18 ते 45 वर्ष
  • प्रकल्पग्रस्त : 18 ते 45 वर्ष
  • भूकंपग्रस्त : 18 ते 45 वर्ष

मिळणारा पगार|Salary Details

  • कंत्राटी वेतन : ₹.16,000/-
  • नियमित वेतन : ₹.25,500 ते 81,100/-

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 10 वी, 12 वी प्रमाणपत्र
  • पदवी झाली असेल तर प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • उत्पन्न दाखला
  • जातीचा दाखला
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (चालू वर्षाचे)
  • Domicile/ Nationalityअपंग प्रमाणपत्र (अपंग असल्यास)
  • अनाथ प्रमाणपत्र (अनाथ असल्यास)
  • खेळाडू प्रमाणपत्र (असल्यास)
  • माजी सैनिक प्रमाणपत्र (असल्यास)

Gramsevak Bharti Verification साठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड/पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • दहावीची मूळ गुणपत्रिका
  • बारावीची मूळ गुणपत्रिका
  • पदवीचे मूळ प्रमाणपत्र/गुणपत्रिका (लागू असल्यास)
  • लीव्हिंग सर्टिफिकेटजात प्रमाणपत्र (मूळ)
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र (मूळ)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • रहिवासी प्रमाणपत्र (मूळ)
  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  • राशन कार्ड (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (मूळ)
  • क्रीडा प्रमाणपत्र (मूळ)
  • भूतपूर्व सैनिक कागदपत्रे (मूळ)
  • चरित्र प्रमाणपत्र
  • वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
  • शपथपत्र (नाव/जन्मदिनांक बदल असल्यास)
  • भरलेला अर्ज प्रिंट
  • प्रवेशपत्र
  • दस्तऐवज पडताळणी कॉल लेटर

Gramsevak Exam Pattern| परीक्षा पॅटर्न

विषयप्रश्नमार्क
मराठी भाषा1530
इंग्रजी भाषा1530
सामान्य ज्ञान (GK)1530
बुद्धिमत्ता चाचणी1530
तांत्रिक विषय4080
एकूण100200

Gramsevak Exam Syllabus|अभ्यासक्रम

मित्रांनो ग्रामसेवक भरती चा सर्व विषयांचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे, जो साधारणता सारखाच असतो परंतु चालू वर्षात जेव्हा भरती निघते तेव्हा जाहिरात PDF मध्ये Cross Verify check नक्की करा.

सामान्य ज्ञान (General Knowledge) : यामध्ये भारताचा इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक)महाराष्ट्राचा इतिहास भारतीय राज्यव्यवस्था : राज्यघटना, संसद, न्यायव्यवस्थापंचायती राज व्यवस्था, ग्रामपंचायत कार्यपद्धती शेतकरी चळवळी, सहकार चळवळ महाराष्ट्र भूगोल : नद्या, हवामान, शेती, उद्योग भारत भूगोल : नद्या, पर्वत, खनिजे, शेती चालू घडामोडी (राज्य, राष्ट्रीय, आर्थिक, क्रीडा, विज्ञान)सरकारी योजना (केंद्र + राज्य)ग्रामीण विकास, कृषी योजना, महिला-बाल विकास योजना असा समावेश असतो.

बुद्धिमत्ता चाचणी / बुद्धिमापन : अंकगणितीय तर्क (Number Series)शब्दसंगती (Word Analogies)चित्रात्मक तर्क (Non-verbal Reasoning)Blood RelationCoding–DecodingVenn Diagramदिशा निर्णयन (Direction Sense)क्रम/पद निवड (Order & Ranking)समस्या सोडविणे (Problem Solving)अल्प माहितीवरून निष्कर्ष (Syllogism Basics)

गणित (Mathematics) : बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अपूर्णांक, टक्केवारी नफा-तोटासाधे व्याज, चक्रवाढ व्याज वेळ व काम वेळ, अंतर व वेग घनफळ, क्षेत्रफळ प्रमाण व अनुपात सरासरीसाधारण गणित (Basic Arithmetic)

मराठी भाषा (Marathi Grammar & Comprehension) : शब्दलेखन व शुद्धलेखन समानार्थी, विरुद्धार्थी शब्द वाक्यरचना, वाक्यप्रकार अलंकार, समास, संधि विरामचिन्हे वाक्प्रचार व म्हणी सामासिक शब्द भाषांतर साधे गद्य/पद्य आकलन (Comprehension)

निवड प्रक्रिया | Gramsevak Selection Process : निवडी विषयी बोलायचे झाल्यास लेखी परीक्षा (CBT) झाल्यानंतर टक्केवारी नुसार तसेच कॅटेगिरी नुसार पात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट लावली जाते. त्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवण्यात येते, जर कागदपत्रे पडताळणी व्यवस्थित रित्या पार केली तर त्या उमेदवाराची निवड ग्रामसेवक पदासाठी होते. जर कागदपत्रे पडताळणी मध्ये उमेदवार अपात्र ठरला तर त्याची उमेदवारी बाद करण्यात येते.

Gramsevak Bharti Step by Step Application Process|अर्ज कसा करावा?

अधिकृत जाहिरात मध्ये दिलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईटवर जाऊन Registration करा. मग Login करून तुमचा फॉर्म भरा आवश्यक ती माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.शेवटी सर्व माहिती चेक करा ऑनलाईन पेमेंट करा फॉर्म Submit करा.अर्जाची प्रिंट व Payment केल्याची पावती (Application Form) Download करा.नंतर Exam Hall Ticket ची वाट पहा.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment