EMRS Bharti 2025 : एकलव्य मॉडेल स्कूल निवासी शाळा (ERMS) या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत चालवल्या जातात. या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, निवासी सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी विशेष भर देण्यात येतो. एकलव्य मॉडेल स्कूल निवासी शाळांमध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मार्फत तब्बल 7267 इतक्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.SC/ST उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून देशातील विविध राज्यांमध्ये उपलब्ध पदे भरण्यात येणार आहेत.
EMRS Bharti 2025 त्या भरतीसाठी जर आपणास अर्ज करायचा असेल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण अशी सविस्तर माहिती आपणास खाली देण्यात आली आहे. उमेदवारांना सूचना आहे की अर्ज भरण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.