Indian Railway Megha Bharti 2025 : भारतीय रेल्वे मध्ये 10th उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.(North Central Railway) मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण 1763 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
ही भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे (Merit List) होत असून कोणतीही परीक्षा असणार नाही. प्रशिक्षणाच्या कालावधी मध्ये उमेदवारांना शासनमान्य मानधन दिले जाईल. चला तर मग जाणून घेऊया भरतीची सविस्तर माहिती, रिक्त असणारी पदे, पात्रता, वयाची अट आणि अर्ज प्रक्रिया.
उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत https://rrcpryj.org/ वेबसाईटला भेट द्या.
Recruitment / Careers’ विभागात जाऊन NCR Apprentice Bharti 2025 लिंक निवडा.
अर्ज भरण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.
अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
आवश्यक असल्यास प्रवर्गानुसार अर्ज फी भरा.अर्ज दिलेल्या मुदतीत करावेत.
त्यानंतर आलेली अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2025 आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी बरोबर भरण्याची खात्री करा.
भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून तुमच्याजवळ ठेवा.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
मित्रांनो North Central Railway Bharti ही भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास थोडीशी मदत होईल. अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या Majhi Bharti.in वर रोज भेट द्या.