Jalana Police Patil Bharti 2025 : मित्रांनो जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जालना जिल्हा प्रशासनामार्फत 2025 मध्ये नव्याने पोलीस पाटील पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सदर भरती मुळे जालना जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे.
सदर भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून ती 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. या लेखात आपणास या भरती बद्दलची संपूर्ण माहिती, पदे, पात्रता, वयाची अट, महत्वाच्या तारखा, वयाची अट अशी सविस्तर माहिती दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
भरती बद्दलची अधिकची माहिती
भरतीचे नाव : जालना पोलीस पाटील भरती 2025
नोकरी ठिकाण : जालना जिल्हा
एकूण पदे : 722
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज सुरू दिनांक : 15 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाईट : https://jalnapp.recruitonline.in/
अर्ज फी : खुला प्रवर्ग : ₹800/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹600/-]
Jalana Police Patil Bharti 2025 विभागानुसार पद संख्या
| उपविभाग | पद संख्या |
| जालना | 185 |
| अंबड | 183 |
| परतूर | 153 |
| भोकंदर | 201 |
एकूण जागा : एकूण 722 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वयाची अट : 30 सप्टेंबर 2025 रोजी 25 ते 45 वर्षे असावे.
Jalana Police Patil Bharti 2025 शैक्षणिक पात्रता
- किमान पात्रता 10th उत्तीर्ण असणे आवश्यक.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- ग्रामपंचायत हद्दीतील कायमचा रहिवासी.
- शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम.
- उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसावा.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरू दिनांक | 15 सप्टेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2025 |
| परीक्षा दिनांक | 12 ऑक्टोबर 2025 |
| निकाल | जाहीर होणे बाकी |
आवश्यक कागदपत्रे
- जन्म दाखला / वयाचा पुरावा
- शैक्षणिक प्रमाणपत्र (10वी उत्तीर्ण मार्कशीट)
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड / मतदार ओळखपत्र
- जात प्रमाणपत्र (लागल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
निवड प्रक्रिया
- अर्ज छाननी
- लेखी परीक्षा (लागल्यास)
- मुलाखत
- अंतिम यादी जाहीर
पोलीस पाटलाचे काम
- गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे
- गावातील संशयित हालचाली पोलिसांना कळवणे
- सरकारी आदेश गावात पोहोचवणे
- निवडणूक काळात शांतता राखणे
- नवीन येणाऱ्या व्यक्तींची माहिती ठेवणे
- ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन यांच्यात दुवा म्हणून काम करणे
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- “Apply Online” पर्याय निवडा.नोंदणी करून Username व Password तयार करा.
- अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे (जन्म दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी दाखला इ.) अपलोड करा.
- शेवटी अर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.





