Maharashtra Police Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मोठी भरती होत आहे. यामध्ये शिपाई संवर्गातील 15 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. गृहविभागाने भरती प्रक्रियेचे आदेश जारी केले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भरती राबविण्यात येत आहे. नाशिक पोलीस दलात 172 जागा भरण्याची शक्यता आहे.
Maharashtra Police Bharti मित्रांनो राज्य पोलीस दलासह कारागृह विभागाच्या शिपाई संवर्गातील 15,631 रिक्त पदांच्या घटकानिहाय भरती प्रक्रिया राबविण्याचे गृह विभागाने आदेश दिले आहेत. ही भरती प्रक्रिया दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.2022 ते 2025 वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही अखेरची संधी असेल.
या भरती मार्फत नियमित सराव करत असलेल्या आणि वयाची अट ओलांडलेल्या उमेदवारांना सुद्धा अर्ज करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी जोरदार तयारीला लागून या संधीचा फायदा घ्या.
Maharashtra Police Bharti 2025 Vacancy

Maharashtra Police Bharti Process 2025
- उमेदवार एकपेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकणार नाहीत.
- सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा
- प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी
- शारीरिक चाचणीनंतर एका पदास १० उमेदवारांची निवड
- पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा
- गुणवत्ता यादी शारीरिक व लेखी परीक्षेनंतर
- कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी
मित्रांनो अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया होणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर, या भरतीसाठी जोरदार तयारी सुरू ठेवा. आणि ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास थोडीशी मदत होईल.


