Punjab National Bank Apprentice Recruitment 2026 : मित्रांनो बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पंजाब नॅशनल बँक अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या तब्बल 5138 जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे कारण राज्यात एकूण 232 जागा आहेत. यामध्ये कोल्हापूर (14), मुंबई सिटी (40), मुंबई वेस्टर्न (39), नागपूर (37), नाशिक (28), पुणे (35) आणि ठाणे (39) या मंडळांचा समावेश आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे. 08 फेब्रुवारी 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, इच्छुक उमेदवारांना 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपले अर्ज सादर करता येतील. महत्वाचे म्हणजे, या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणानुसार दरमहा रु.12,300/- ते रु.15,000/- मानधन दिले जाणार आहे.
Punjab National Bank Apprentice Recruitment 2026
भरती विभाग : पंजाब नॅशनल बँक
भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी
एकूण जागा : 5138
पदाचे नाव : अप्रेंटिस
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
पगार : ₹.15,000/-
Eligibility Criteria For Punjab National Bank Bharti 2026
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी.
- NATS नोंदणी : जर तुम्ही नॅशनल अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत नोंदणीकृत असाल, तर तुमची पदवी उत्तीर्ण होऊन 04 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा.
- स्थानिक भाषेचे ज्ञान : उमेदवार हा ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहे, तिथली स्थानिक भाषा तुम्हाला वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे आवश्यक आहे.
वयाची अट/Age Limit
- किमान वय : 20 वर्षे
- कमाल वय : 28 वर्षे
वय सवलती
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती : 05 वर्षे सवलत
- ओ.बी.सी : 03 वर्षे सवलत
- दिव्यांग : 10 वर्षे सवलत
- विधवा/घटस्फोटित महिला : सामान्य/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 35 वर्षे, ओ.बी.सी साठी 28 वर्षे आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीसाठी 40 वर्षांपर्यंत सवलत.
प्रशिक्षणाचा कालावधी आणि पगार
- ग्रामीण/निम-शहरी/शहरी : रु.12,300/- प्रती महिना
- मेट्रो शहरे : रु.15,000/- प्रती महिना
निवड प्रक्रिया/Selection Process
- ऑनलाइन लेखी परीक्षा
- कागदपत्र पडताळणी
- स्थानिक भाषा चाचणी
- वैद्यकीय तपासणी
परीक्षेचे स्वरूप
| विषय | प्रश्नांची संख्या | गुण | कालावधी |
| सामान्य/वित्तीय जागरूकता | 25 | 25 | |
| सामान्य इंग्रजी | 25 | 25 | |
| संख्यात्मक आणि तर्कक्षमता | 25 | 25 | |
| संगणक ज्ञान | 25 | 25 | |
| एकूण | 100 | 100 | 60 मिनिटे |
Punjab National Bank Apprentice Recruitment 2026 Apply Online
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
अर्ज फी/Application Fee
- सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (पुरुष) : रु.944/-
- सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (महिला) : रु.708/-
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अपंग (पुरुष/महिला) : रु.236/-
- तृतीयपंथी : रु.236/-
अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज
- सर्व प्रथम बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- तेथे दिलेली BFSI Sector Skill Council of India ची लिंक उघडा किंवा याच्या अधिकृत वेबसाइटवर जावा.
- Apprenticeship Application Form वर क्लिक करून आपली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा.
- याशिवाय उमेदवाराने NAPS किंवा NATS या संकेस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी
| 📃 जाहिरात PDF | CLICK HERE |
| 💻 ऑनलाईन अर्ज | CLICK HERE |
| 🌐 अधिकृत वेबसाईट | CLICK HERE |
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.



