CRPF Constable Bharti 2026 : मित्रांनो आपण जर भरतीची तयारी करत असाल आणि तुम्हाला जर देशसेवा करायची असेल तर एक खास मोठी संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 9195 जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्याच्या सर्व सूचना व अटी आपणास सविस्तर स्वरूपात खाली देण्यात आले आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
10 वी आणि 12 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ही नोकरीची नामी संधी आहे. यामध्ये नियुक्त उमेदवारास महिना ₹.21,700 ते 69,100 इतका पगार देण्यात येईल. यामध्ये वयाची अट कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 21 ते 27 वर्षे, उर्वरीत ट्रेड 18 ते 23 वर्षे अशी ठेवण्यात आली आहे. याच बरोबर उमेदवारास संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्या.
CRPF Constable Bharti 2026 – थोडक्यात आढावा
| भरती विभाग | केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) |
| भरती श्रेणी | केंद्र सरकारी नोकरी |
| एकूण जागा | 9195 |
| पदाचे नाव | कॉन्स्टेबल |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अर्ज फी | General/OBC/EWS – ₹.100 /-SC/ST/EXSM/महिला – फी नाही |
| पगार | ₹.21,700 ते 69,100 महिना |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
CRPF Constable Bharti 2026 In Marathi
एकूण रिक्त पदे : 9195
रिक्त पदाचे नाव आणि तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | कॉन्स्टेबल (ट्रेडसमन आणि टेक्निकल) | 9175 |
| 02 | कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) | 20 |
| एकूण | 9195 |
CRPF Constable Bharti 2026 Education Qualification-शैक्षणिक पात्रता
- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) – i) 10 वी पास ii) अवजड वाहन चालक परवाना असावा.
- कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल) – i) 10 वी पास ii) ITI मेकॅनिक मोटर व्हेईकल iii) 01 वर्षाचा अनुभव.
- कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) – i) 10 वी पास ii)मेसनरी किवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
- उर्वरीत ट्रेड – फक्त 10 वी पास
CRPF Constable Bharti 2026 Age Limit
वयाची अट : अर्जदाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST – 05 वर्षांची सूट, OBC – 03 वर्षांची सूट]
- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) – 21 ते 27 वर्षे
- उर्वरीत ट्रेड – 18 ते 23 वर्षे
CRPF Constable Bharti 2026 Salary Details
मिळणारा पगार : ₹.21,700 ते 69,100 महिना
CRPF Constable Bharti 2026 Exam Pattern
| विषय | प्रश्न | गुण |
| General Knowledge | 25 | 25 |
| Reasoning | 25 | 25 |
| Mathematics | 25 | 25 |
| Language | 25 | 25 |
| एकूण | 100 | 100 |
CRPF Constable Bharti 2026 Important Dates
- अर्ज सुरू दिनांक : 20 एप्रिल 2026
- अर्जाची शेवटची तारीख : 19 मे 2026
- परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना
- पूर्ण अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. वरती आपल्याला या भरतीसाठी अर्ज करा त्याची लिंक दिलेली आहे.
- त्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण अर्जामध्ये भरत असलेली सर्व माहिती आपल्याला योग्य व्यवस्थित व खात्रीशीर भरायची आहे जेणेकरून आपला अर्ज नंतर कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
- आपले वय आपले ईमेल आयडी, मोबाईल नंबर आपल्या शैक्षणिक पात्रता आपल्याला जर अनुभव असेल तर तो आपण ड्रायव्हिंग लायसन्स जोडणार आहोत तर त्याचा नंबर इत्यादी सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण या भरती संदर्भातील सर्व माहिती योग्य रित्या वाचून खात्री करून घेतल्यानंतर मगच या भरतीसाठी ची फी भरावी फी भरताना आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- वरती दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला अनुसूचित जाती जमाती तसेच महिला यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही आहे.
- आपण भरतीचे हे निकष लक्षात ठेवून मगच भरायचा आहे.
- फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास आपण जाहिरातीमध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून प्रवेश पत्र डाऊनलोड करताना नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


