Railway RRC NWR Bharti 2025 : 10th/ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत एकूण 2162 पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. सदर भरती अप्रेंटिस पदासाठी होत आहे.10th आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचे आहेत. या भरती मार्फत विविध विभागामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट च्या आधारे केली जाणार आहे.
भरतीसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा, पात्रता काय असणार आहे आणि महत्वाच्या तारखा या बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. तुम्हाला जर रेल्वेत काम करण्याचा अनुभव हवा असेल तर ही संधी अजिबात सोडू नका. लगेच हा लेख वाचा आणि अर्ज करा.
Railway RRC NWR Bharti 2025 भरतीची संपूर्ण माहिती
| भरती विभाग | भारतीय रेल्वे (RRB) |
| भरतीचे नाव | Railway RRC NWR Bharti 2025 |
| पदाचे नाव | अप्रेंटिस |
| रिक्त पदे | 2162 |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| मिळणारा पगार | रु.10,000/- |
| पात्रता | 10th/ITI |
| वयाची अट | 15 ते 24 वर्षे |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
पदे आणि उपलब्ध जागा
| पदाचे नाव | रिक्त जागा |
| अप्रेंटिस | 2162 |
Railway RRC NWR Bharti 2025-अर्ज फी
| प्रवर्ग | फी |
| सामान्य/ओबीसी/EWS | रु.100/- |
| SC/ST/ट्रान्सजेंडर/EBC/महिला | फी नाही |
शैक्षणिक पात्रता : भारतीय रेल्वे द्वारे अप्रेंटीस पदावर नियुक्ती साठी शैक्षणिक पात्रता या लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये अर्जदार उमेदवार हा किमान SSC बोर्डाची परीक्षा दिलेला असावा म्हणजे उमेदवार 10थ पास असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवाराने संबंधित ट्रेड मध्ये ITI चा डिप्लोमा पण केलेला असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया : निवड ही मेरिट लिस्ट च्या आधारे केली जाईल.
महत्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्ज सुरू दिनांक | 03 ऑक्टोबर 2025 |
| अर्जाची अंतिम दिनांक | 02 नोव्हेंबर 2025 |
Railway RRC NWR Bharti 2025 IMP Links & Official Notification
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Railway RRC NWR Bharti 2025-अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम आपणास टेबल मधील Apply Online या लिंक वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर अधिकृत संकेतस्थळ ओपन होईल.
- या वरती तुमची नोंदणी करून घ्यावी. नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करावे.
- आता अर्ज करा हा पर्याय शोधा. लिंक वर क्लिक करून भरतीचा फॉर्म ओपन होईल.
- फॉर्म मध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती अचूक भरा.
- तुमची सही आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आपलोड करा.
- ऑनलाईन अर्ज फी भरून अर्ज सबमिट करा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


