SSB Sport Quota Bharti 2026 : मित्रांनो आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि आपल्याकडे नॅशनल लेव्हल चे मेडल्स असतील तर सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये स्पोर्ट कोटा अंतर्गत 404 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. आकर्षक पगाराची नोकरी मिळवण्यासोबत देशसेवा करण्याची सुद्धा ही नामी संधी आहे. यासाठी आपणास 09 जून 2026 अखेर अर्ज दाखल करावा लागेल.
SSB Sport Quota Bharti 2026 भरतीसाठी अर्ज करण्याच्या सर्व सूचना व अटी आपणास खाली सविस्तरपणे देण्यात आले आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार याची नोंद घ्यावी.
SSB Sport Quota Bharti 2026-थोडक्यात माहिती
- भरती विभाग : सशस्त्र सीमा बल (SSB)
- भरती श्रेणी : केंद्र सरकारी
- भरती प्रकार : सरकारी नोकरी
- एकूण जागा : 404
- पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) Sports Quota
- अर्ज पद्धती : ऑनलाईन
- अर्जाची शेवटची तारीख : 09 जून 2026
SSB Sport Quota Bharti 2026 Vacancies
पदांची माहिती:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) Sports Quota | 404 |
SSB Sport Quota Bharti 2026 Qualification
शैक्षणिक पात्रता :
- (i) ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये एखाद्या राज्याचे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे; किंवा
- (ii) वरिष्ठ (Senior) / कनिष्ठ (Junior) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये पदके मिळवणारे खेळाडू; किंवा
- (iii) ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ (१८ वर्षांवरील वयोगट), ‘खेलो इंडिया विंटर गेम्स’ किंवा ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’ मध्ये पदके मिळवणारे खेळाडू; किंवा
- (iv) ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ मध्ये पदके मिळवणारे खेळाडू; किंवा
- (v) ‘स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (SGFI) च्या स्पर्धांमध्ये पदके मिळवणारे खेळाडू; किंवा
- (vi) ज्या खेळाडूंनी ‘आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळां’द्वारे (Inter-University Sports Boards) आयोजित आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे; किंवा
- (vii) ज्या खेळाडूंनी ‘अखिल भारतीय शालेय क्रीडा महासंघा’द्वारे (All India School Games Federation) आयोजित शालेय स्तरावरील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्याच्या शालेय संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
| जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वरील पात्रता असणे आवश्यक आहे.
वयाची अट : 09 जून 2026 18 ते 23 वर्षे [SC/ST – 05 + 05 वर्षाची सूट, OBC – 03 + 05 वर्षाची सूट]
अर्ज फी : General/OBC/EWS : ₹.100, SC/ST/महिला : फी नाही.
मिळणारा पगार : ₹.21,700 ते 69,100/-
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
SSB Sport Quota Bharti 2026 Important Dates
महत्वाच्या तारखा:
| कार्यक्रम | तारखा |
| अर्ज सुरू दिनांक | 09 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 09 जून 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?
- मित्रांनो सदरची भरती ही फक्त खेळाडूंसाठी असल्यामुळे आपण कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही जर आपण एखाद्या क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केला असेल तरच आपल्यासाठी ही नोकरीची संधी असणार आहे.
- त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जाहिरात वाचायचे जाहिरातीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या से 50 पेक्षा जास्त खेळ दिले त्या खेळांमध्ये तुम्ही उत्तम कामगिरी करून मेडल्स किंवा प्रमाणपत्र मिळवले आहेत.
- त्या त्या सर्व खेळांची माहिती त्यामध्ये आपल्याला मिळालेले मेडल्स आणि सरकारला अपेक्षित असलेले मेडल ची सर्व माहिती वाचा आणि मग या भरतीसाठी अर्ज करा.
- महिला तसेच अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली नाही त्यामुळे आपण फॉर्म भरल्यानंतर आपण भरलेला फॉर्म बरोबर आहे याची खात्री करून मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
- आपण जा खेळामध्ये विशेष प्राविण्य किंवा गुण प्राप्त केले असतील त्या खेळाच्या ऑफिस मधून तुम्ही तुमचे प्रमाणपत्र व्हेरिफाय करून घ्यायला तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- तुम्ही खेळाडू नाही पण ही माहिती तुमच्या पर्यंत आली आहे तर तुमचं कर्तव्य तुमच्या एका खेळाडू मित्र-मैत्रिणीला ही माहिती शेअर करायची जेणेकरून त्यांनी या सरकारी नोकरीचा फायदा घेऊ शकतील.
- इतर कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणीसाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


