Krushi Mitra Bharti 2026 : महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील कृषी विभाग अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या सोबत शेतकरी मित्र/कृषी मित्र यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरती प्रक्रिये मार्फत महाराष्ट्रातील तमाम उमेदवारांना नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी असू शकते.
राज्यातील कृषी विभाग अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबवल्या जात आहेत. कृषी योजनांची माहिती थेट गावपातळीवर पोहोचली पाहिजे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी ‘शेतकरी मित्र / कृषी मित्र’ ही संकल्पना पुढे आणण्यात येत आहे. अधिकृत घोषणा जाहिरात खाली पहा.
Krushi Mitra Bharti 2026-थोडक्यात माहिती
| घटक | तपशील |
| भरती विभाग | महाराष्ट्र कृषी विभाग |
| पदाचे नाव | शेतकरी मित्र/कृषी मित्र |
| एकूण पद संख्या | 11,587 |
| मिळणारे मानधन | ₹.18,000 अंदाजे |
| भरती प्रक्रिया | जिल्हा स्तरावर |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
| शैक्षणिक पात्रता | पदवीधरांना प्राधान्य |
शेतकरी मित्र / कृषी मित्र’ पदासाठी सुमारे 18 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. अधिकृत जाहिरात आल्यानंतर वेतन, मानधन, करार कालावधी आणि इतर अटी स्पष्ट होतील. ग्रामीण भागात काम करण्याची तयारी असलेल्या तरुणांसाठी हे पद चांगला रोजगार पर्याय ठरू शकतो. (कृषी मित्र भरती 2026) Krushi Mitra Bharti 2026
शेतकरी मित्र पदाचे काम काय असणार?‘
शेतकरी मित्र’ हे पद थेट शेतकऱ्यांशी जोडलेले असणार आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना खालील जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात.
- शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती देणे.
- पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे.
- खत, बियाणे व औषध वापराबाबत माहिती देणे.
- शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवणे.
- कृषी अधिकाऱ्यांना क्षेत्रीय कामात मदत करणे.
- शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवणे.
उमेदवारांनी खालील गोष्टी तयार ठेवाव्यात.Krushi Mitra Bharti 2026
1) शैक्षणिक कागदपत्रे.
2) आधार कार्ड.
3) रहिवासी दाखला.
4) जात प्रमाणपत्र. (लागू असल्यास)
5) पासपोर्ट फोटो.
6) ई-मेल आयडी व मोबाईल नंबर. (कृषी मित्र भरती 2026)
Krushi Mitra Bharti 2026 Links
| अधिकृत जाहिरात | लवकरच उपलब्ध होईल |
| अधिकृत माहिती | येथे क्लिक करा |
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


