IIFCL Bharti 2026|इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत 37 जागांसाठी भरती! पगार ₹.55,000/-

IIFCL Bharti 2026 : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी मध्ये 037 जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये उमेदवारांना ₹.55,000 इतका पगार मिळणार आहे. या भरती मार्फत आपण आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करू शकता. सदर भरती मॅनेजर ग्रेड B, असिस्टंट मॅनेजर ग्रेड A या पदांसाठी होत आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याच्या सर्व सूचना व अटी आपणास सविस्तर स्वरूपात खाली देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची संक्षिप्त माहिती

भरती संस्थाइंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी
भरती प्रकारसरकारी नोकरी
एकूण जागा037
पदाचे नावमॅनेजर ग्रेड B, असिस्टंट मॅनेजर ग्रेड A
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू दिनांक18 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख10 एप्रिल 2026

IIFCL Bharti 2026 Vacancy Details

जाहिरात क्र.: IIFCL/HCM/2026/03 & IIFCL/HCM/2026/04

पदांची संख्या : 037

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01मॅनेजर ग्रेड B04
02असिस्टंट मॅनेजर ग्रेड A33
एकूण37

Eligibility Criteria For IIFCL Bharti 2026

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा असावा.अथवा LLB / CA / CS / CMA / ICWA / B.Tech / B.E. यापैकी कोणतीही पात्रता असणे आवश्यक आहे.तसेच अभियांत्रिकी, पर्यावरण व्यवस्थापन किंवा पर्यावरण विज्ञान या क्षेत्रांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा धारक उमेदवार देखील पात्र राहतील.समाजकार्य, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र किंवा आर्थिक विकास सेवा या विषयांमध्ये M.Sc. किंवा समतुल्य पदव्युत्तर शिक्षण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.यासोबत संबंधित क्षेत्रातील किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

पद क्र.2 : उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.किंवा LLB / CA / CS / CMA / ICWA / B.Tech / B.E. यापैकी कोणतीही पात्रता असणे आवश्यक आहे.अभियांत्रिकी, पर्यावरण व्यवस्थापन किंवा पर्यावरण विज्ञान या विषयांतील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा असलेले उमेदवारही पात्र ठरतील.समाजकार्य, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र किंवा आर्थिक विकास सेवा या विषयांमध्ये M.Sc. किंवा समतुल्य पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात.संबंधित क्षेत्रातील किमान २ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

वयाची अट (Age Limit)

28 फेब्रुवारी 2026रोजी [SC/ST –05 वर्षांची सूट, OBC – 03 वर्षांची सूट ]

पद क्र.1 : 40 वर्षांपर्यंत(SC/ST साठी 45 वर्षांपर्यंत अर्ज करू शकता) (तर OBC – 43 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात)

पद क्र.2 : 21 ते 30 वर्षे(SC/ST साठी 35 वर्षांपर्यंत अर्ज करू शकता) (तर OBC – 33 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात)

अर्ज फी (Application Fee)

  • General/OBC/EWS – 600 /- रु
  • SC/ST/PWD – 100 /- रु

IIFCL Bharti 2026 Salary Details

  • पद क्र 1 – 55,200 /- रु प्रती महिना व (इतर भत्ते )
  • पद क्र 2 – 44,500 /- रु प्रती महिना व (इतर भत्ते )

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू दिनांक18 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख10 एप्रिल 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFपद क्र.1 क्लिक करा
पद क्र.2 क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply

  • उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना pdf मध्ये दिल्या आहेत.
  • अर्ज हे अधिकृत पोर्टल वरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज दाखल करण्यासाठी 10 एप्रिल 2026 पर्यंत मुदत असेल.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment