Talathi Bharti 2026: तलाठी भरती जाहीर! ऑनलाइन अर्ज, पात्रता, वयोमर्यादा व महत्त्वाच्या तारखा

Talathi Bharti 2026: महाराष्ट्र तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली! शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रे आणि अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत येथे सविस्तर पाहा.

महाराष्ट्र महसूल व वन विभागात सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महसूल विभागातील तलाठी (Talathi) पदांसाठीची उत्सुकता आणि प्रतीक्षा आता संपली असून नवीन पदभरतीची प्रक्रिया सुरु होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ग्रामीण भागातील प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा कणा म्हणून तलाठी या पदाकडे पाहिले जाते. त्यामुळेच या भरतीसाठी दरवर्षी राज्यातील लाखो उमेदवार रात्रंदिवस अभ्यास करत असतात. जर तुम्हीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते.

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Talathi Bharti 2026 विषयीची सर्व अधिकृत व अचूक माहिती सोप्या भाषेत देणार आहोत. यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप, लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा, याची सविस्तर माहिती समाविष्ट आहे. लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Talathi Bharti 2026 थोडक्यात माहिती

तपशीलमाहिती
संस्थेचे नावमहसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन
भरतीचे नावमहाराष्ट्र तलाठी भरती 2026
पदाचे नावतलाठी (गट-क)
एकूण जागा2619+3088 = 5707 पदे
अर्ज पद्धतऑनलाइन (Online)
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वेतनजाहिरात पाहावी
अर्जाची सुरुवात२७ जून २०२६
अर्जाची अंतिम तारीख०५ ऑगस्ट २०२६
अधिकृत वेबसाइटhttps://mpsconline.gov.in/candidate/login

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1उद्योग निरीक्षक०९
2तांत्रिक सहाय्यक०३
3कर सहाय्यक२८२
4सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क४६१
5लिपिक टंकलेखक१८६४
6गट महसूल अधिकारी (तलाठी) गट क१५३९
7वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक गट क११
8सहाय्यक अधीक्षक गट क११
9सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क२५४
10लिपिक टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)९४४
11लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग३३९
एकूण५,७०७

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

येथे सर्व ११ पदांची शैक्षणिक पात्रता स्पष्ट आणि वाचायला सोप्या Format मध्ये दिली आहे.

  • पद क्र १ – i) इंजिनियरिंग पदवी किवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किवा सायन्स शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र २ – पदवीधर
  • पद क्र ३ – i) पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी आवश्यक
  • पद क्र ४ – i) १० वी पास ii) ऑटोमोबाईल इंजिनियरिंग डिप्लोमा किवा पदवी किवा समतुल्य कोर्स आवश्यक
  • पद क्र ५ – i) पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी आवश्यक
  • पद क्र ६ – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र ७ – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र ८ – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र ९ – मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F FC)
  • पद क्र १० – i) पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी आवश्यक
  • पद क्र ११ – i) पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी आवश्यक

वयाची अट Age Limit

प्रवर्गानुसार वयाची मर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

पद क्र.पदाचे नाववयोमर्यादा (खुला प्रवर्ग)मागासवर्गीय/EWS / अनाथ
1उद्योग निरीक्षक१९ ते ३८ वर्षे१९ ते ४३ वर्षे
2तांत्रिक सहाय्यक१९ ते ३८ वर्षे१९ ते ४३ वर्षे
3कर सहाय्यक१८ ते ३८ वर्षे१८ ते ४३ वर्षे
4सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क१९ ते ३८ वर्षे१९ ते ४३ वर्षे
5लिपिक टंकलेखक१९ ते ३८ वर्षे१९ ते ४३ वर्षे
6गट महसूल अधिकारी (तलाठी) गट कअधिसूचने नुसारअधिसूचने नुसार
7वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक गट कअधिसूचने नुसारअधिसूचने नुसार
8सहाय्यक अधीक्षक गट कअधिसूचने नुसारअधिसूचने नुसार
9सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट कअधिसूचने नुसारअधिसूचने नुसार
10लिपिक टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)अधिसूचने नुसारअधिसूचने नुसार
11लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागअधिसूचने नुसार

परीक्षा शुल्क (Application Fee)

अ.क्र.प्रवर्ग / श्रेणीपरीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग (Unreserved / General)₹ ३९४/-
मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) / अनाथ₹ २९४/-
माजी सैनिक (Ex-Servicemen)₹ ४४/-

महत्वाच्या तारखा

अ.क्र.टप्पा / तपशीलतारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख२७ जून २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख०५ ऑगस्ट २०२६
प्रवेशपत्र (Hall Ticket)परीक्षेच्या ०८ दिवस आधी
परीक्षेची तारीख२५ ऑक्टोबर २०२६

Talathi Bharti 2026 निवड प्रक्रिया

तलाठी भरतीची निवड प्रक्रिया संगणकावर आधारित परीक्षेवर (Computer Based Test – CBT) अवलंबून असते.

  • संगणकावर आधारित वस्तुनिष्ठ परीक्षा (CBT Exam): ही परीक्षा एकूण २०० गुणांची असते (१०० प्रश्न).
  • कागदपत्र पडताळणी (Document Verification): गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाते.
  • अंतिम निवड यादी: परीक्षेतील गुण व कागदपत्र पडताळणीच्या आधारे अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाते.

महत्वाच्या लिंक्स

Notification PDFयेथे क्लिक करा
Online Applyयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा
Talathi Bharti 2026
Talathi Bharti 2026
Talathi Bharti 2026

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ऑनलाइन फॉर्म भरताना व नंतर कागदपत्र पडताळणीवेळी खालील सर्व कागदपत्रे तयार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

  • दहावी आणि बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र (Marksheet & Certificate)
  • पदवी उत्तीर्ण गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र (Degree Marksheet & Certificate)
  • शाळा सोडल्याचा दाखला (TC / LC) किंवा जन्म दाखलाजातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) – आवश्यक असल्यास
  • जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) – उपलब्ध असल्यास
  • नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer) – लागू असलेल्या प्रवर्गासाठी चालू आर्थिक वर्षातीलईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (EWS Certificate) – लागू असल्यास
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)दिव्यांग / खेळाडू / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स)
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्कॅन केलेली सही
  • संगणक अर्हता प्रमाणपत्र (MS-CIT किंवा तत्सम, असल्यास)

How To Apply Talathi Bharti 2026

  1. वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम महसूल विभागाच्या किंवा अधिकृत पोर्टलमधील भरती लिंकवर क्लिक करा.
  2. नवीन नोंदणी करा (New Registration): जर तुम्ही नवीन युजर असाल, तर नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून नोंदणी करा.
  3. लॉगिन करा: नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या मोबाईलवर आलेला User ID आणि Password वापरून पोर्टलवर लॉगिन करा.
  4. वैयक्तिक माहिती भरा: अर्जामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक तपशील काळजीपूर्वक भरा.
  5. जिल्हा निवड: ज्या जिल्ह्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तो जिल्हा निवडा.
  6. कागदपत्रे अपलोड करा: तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सही आणि आवश्यक सर्व कागदपत्रे सांगितलेल्या फॉरमॅटनुसार स्कॅन करून अपलोड करा.
  7. फॉर्मची पडताळणी करा: भरलेला फॉर्म एकदा व्यवस्थित तपासून घ्या, जेणेकरून कोणतीही चूक राहणार नाही.
  8. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरा: तुमच्या प्रवर्गासाठी ठरलेले परीक्षा शुल्क UPI, नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे ऑनलाइन जमा करा.
  9. अर्जाची प्रिंट काढा: पेमेंट यशस्वी झाल्यानंतर पूर्ण भरलेल्या अर्जाची (Application Form) प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.

महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पीडीएफ (Notification PDF) सविस्तर वाचून घ्यावी.
  • अर्जात दिलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू ठेवावा.
  • एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास किंवा खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख संपण्यापूर्वीच फॉर्म भरावा, कारण शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन होण्याचा धोका असतो.

महाराष्ट्र तलाठी भरती 2026 ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत सुवर्णसंधी आहे. योग्य नियोजन, अभ्यासक्रमाची अचूक माहिती आणि वेळेचे नियोजन करून अभ्यास केल्यास या परीक्षेत निश्चितच यश मिळू शकते.

Leave a Comment